Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेनेचे घंटानाद आंदोलन / दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी शिंदे, ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

बकरी ईदच्या निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या वतीने कल्याणच्या दुर्गाडी  किल्याजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे आंदोलन त्यांच्यानंतरही अद्यापही सुरु आहे.

 बकरी ईदच्या दिवशी कल्याण येथील मुस्लिम बांधव एकत्रितपणे येऊन दुर्गाडी किल्याच्या  परिसरात नमाज पडतात.  कायदा सुव्यवस्था बिघडु नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून नमाज कार्यक्रम संपेपर्यंत कोणालाही दुर्गाडी देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोडत नाहीत. शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी  या घंटानाद आंदोलनाला सुरवात केली. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.  



यावेळी कल्याणच्या लोकमान्य टिळक चौक येथून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केले. मात्र पोलीस प्रशासनाने या दोन्ही गटांना लालचौकी परिसरातच बॅरीकेट लावून रोखून धरले. ज्याठिकाणी काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ धक्काबुक्कीही झाली. तर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जात होती.  आजही सकाळी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या वतीने घटानांद आंदोलन केले, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले, व नंतर सोडून दिले.

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, मुस्लिम बांधव सकाळी नमाज पडतात. शांतता राहवी म्हणजे मंदिरातील घंटा व नगारा बांधून ठेवतात आम्हाला  मान्य आहे. परंतु हिंदु बांधवांना दर्शन घेण्यास मनाई करतात मंदिरा पर्यंत जाऊन देत नाही हे पोलीस प्रशासनाचे चुकीचे आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो व म्हणून आम्ही घटानांद आंदोलन प्रत्येकवर्षी  करीत आहोत असे सांगितले. यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, निलेश शिंदे, विजया पोटे, छाया वाघमारे, माजी परिवहन सदस्य  सुनील खारूक, शिवसेना उपशहर संघटक विलास रंदवे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी सांगितले की, जर हे सरकार हिंदुत्ववादी आहे तर मग एका समाजाला न्याय व दुसऱ्या समाजावर अन्याय होत आहे. हया सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो. हे हिंदुत्ववादी सरकार नाही तर बेगडी सरकार असल्याची टीका विजय साळवी यांनी केली.  आम्ही लेखी पत्र पोलीस प्रशासनाला दिले होते दर्शन परवानगी साठी परंतु पोलीस प्रशासनाने काहीही उत्तर दिले नाही असे सांगितले.  यावेळी साईनाथ तारे, धनजंय बोडारे, शरद पाटील, बाळा परब, यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments