Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवसेना महिला आघाडी तर्फे व श्री.महालक्ष्मी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कष्टकरी महिलांचा मेळावा

 

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 31,32,33 मधील शिवसेना महिला आघाडी तर्फे व श्री.महालक्ष्मी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कष्टकरी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.कल्याण पश्चिमेतील त्रिविक्रम मंदिरातील सभागृहात मेळावा पार पडला.शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय श्री गोपाळ लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली,आणि कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत झालेल्या ह्या मेळाव्यात शेकडो महिलांनी हजेरी लावली.

मेळाव्याचे आयोजन शिवसेना उपशहर प्रमुख नितीन माने,विभाग संघटक सौ. शारदा नितीन माने,व शिवसेनेच्या अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.मेळाव्याला आलेल्या असंख्य महिलांना मान्यवरांनी विविध उपक्रम संबंधी मार्गदर्शन केले.विविध योजनासंबंधी माहिती देऊन ,आणि त्यांना भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित केले.

शिवसेना महिला आघाडी कष्टकरी महिलांच्या पाठीशी सदैव राहील असे आश्वासन आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिले.कष्टकरी महिलांच्या उज्वल भविष्यासाठी शिवसेना महिला आघाडी सतत कार्यरत राहील असे मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments