ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्व मतदार संघातील विद्यमान आमदार सौ.सुलभा गायकवाड ,आणि माजी आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त मतदार संघातील नागरिकांसाठी सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी आमदार सुलभाताई नेहमीच पुढाकार घेत असतात.त्याच अनुषंगाने वाढ दिवसाचे निमित्ताने नागरिकांसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत आयुष्यमान कार्ड शिबीर घेण्यात आले.हजारो नागरिकांनी हा शिबिराचा लाभ घेतला
परिसरातील आणि आसपासच्या ग्रामीण भागातील असंख्य महिलांनी सदर उपक्रमात सहभाग घेऊन सुलभा ताईंना वाढ दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यालयात सुलभाताईना भेटण्या साठी कार्यकर्ते आणि महिलांची मोठी संख्या दिसून आली.परिसरातील जेष्ठ नागरिक,महिला, व विविध क्षेत्रात काम करणारे प्रतिष्ठित नागरिक,व्यावसायिक मान्यवर,राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी,आणि सरकारी अधिकाऱ्यांनी सदर मंगल प्रसंगी उपस्थिती लावली.
दिवस भर शुभेच्छांचा वर्षाव केला जात होता.त्यावरून सुलभा ताईंची लोकप्रियता किती मोठी आहे हे समजले.
.jpg)




Post a Comment
0 Comments