ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 25 मधील स्थानिक माजी नगरसेविका सौ.प्रियांका विद्याधर भोईर व श्री.विद्याधर भोईर माजी नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून प्रभागातील पौर्णिमा टॉवर ते पंचपरमेश्वर मंदिर पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.त्याच वेळी पंच परमेश्वर मंदिराच्या सभामंडपाचे बांधकामाचे उद्घाटनही आमदार साहेबांच्या हस्ते पार पडले.
त्या प्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रभागातील सर्व नागरिकांना आश्र्वासित केले की आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आमच्या पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते सदैव तयार आहोत.कल्याण शहरातील सर्व नागरिकांसाठी विविध विकासप्रकल्प साकारत आहेत.आजवर निधी अभावी कोणतेही विकासाचे काम अडले नाही, आणि या पुढेही अडणार नाही.लोकांनी या शहराचा आमदार म्हणून दोनदा निवडून दिले आहे,लोकांच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ दिला जाणार नाही.
.jpg)




Post a Comment
0 Comments