ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेत झाड कोसळुन अपघातग्रस्त मृत पावलेल्या रिक्षा चालक व प्रवाशांच्या तसेच रुक्मिणी बाई रुग्णालयात वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी रिक्षा चालक मालक असोसिएशनने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशानाकडे केली आहे.
याबाबत केडीएमसीचे अतिरीक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची अध्यक्ष प्रणव पेणकर व प्रमुख संघटक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी मुख्य पदाधिकारी कार्यकर्ते रिक्षाचालक यांच्या समवेत शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. आठ दिवसात त्या मृत चार जणांच्या कुटुबियांना मदत करा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
कल्याण पुर्व चिचंपाडा परीसरात वादळवार्याने एक झाड प्रवाशी वाहतुक करत असलेल्या रिक्षावर कोसळुन तीन जण ठार झाले. त्यात दोन प्रवाशी व एक रिक्षा चालकाचा समावेश आहे. उमाशंकर वर्मा वय ५३ असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे. रस्त्याच्या लगत असलेली जुनाट व वाढलेली झाडे छाटणी महापालिका प्रशासन करत असलेला हलगर्जी पणा व दुर्लक्ष यामुळेच तीन जणांना जीव गमवावा लागला असा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. रिक्षा चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणव पेणकर, प्रमुख संघटक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी रिक्षा संघटनेच्या इतर पदाधिकारी यांच्या समवेत अतिरीक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेतली व निवेदन दिले.
निवेदनात मृत पावलेल्या रिक्षाचालक व दोन प्रवाशी यांना नुकसान भरपाई देऊन महापालिकेमार्फत आर्थिक मदत करण्याची मागणी केली. पुनशः अशा घटना घडु नये रस्त्यालगत व इतर जुनाट व प्रंचड वाढलेल्या झांडाची तत्परतेने छाटणी करावी अपघातग्रस्त खड्डेमय रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशीही मागणी व विनंती केली. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी शासनाला महापालिकेतर्फे अहवाल पाठवुन मूख्यमंञी सहाय्यतानिधीतुन अपघातग्रस्त मृत रिक्षाचालक व प्रवाशी यांना आर्थीक मदत दिली जाईल असे स्पष्ट केले. अपघातग्रस्त मृत रिक्षाचालक व मृत प्रवाशांना आर्थीक मदत मिळवुन देण्यासाठी रिक्षा संघटनेच्या वतीने शासनाकडे ही पञव्यवहार व पाठपुरावा करु असे प्रणव पेणकर म्हणाले.
रुक्मीणीबाई रुग्णालयात मध्ये नुकतेच उपचाराअभावी व वेळेत रुग्णवाहीका उपल्बध न झाल्याने मृत पावलेल्या महिलेच्या लहान मुलांची व झाड कोसळुन मृत पावलेल्या रिक्षाचालक व प्रवाशांच्या कुंटुबिंयांची परस्थिती हलाखीची आहे. घरातील कर्ते कमवते माणसं गमावल्याने त्यांना पुढील जिवन जगण कठीण आहे .आठ दिवसात आर्थिक मदत करा अन्यथा उग्र आंदोलन छेडु असा इशारा रिक्षा संघटनेचे प्रमुख संघटक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिला आहे.
यावेळी रिक्षा संघटनेच्या शिष्टमंडळात जॉन कॅलिमिनो, संतोष नवले, जितेद्रं पवार, साबु चेरीअन, प्रशांत बोटे, नुर जमादार, शगीर शेख, आबा भसमारे, सुनिल मोरे, बंडु वाडेकर, अनिल जगताप, प्रताप सरोदे, रिझवान शेख, सुभाष चौव्हाण, हिरु लोखंडे, चंद्रशेखर नवले, प्रविण वासनिक,गोरख झाडे आदी पदाधिकारी व शेकडो रिक्षा चालक उपस्थितीत होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments