केडीएमसी आयुक्तांच्या मान्यतेने अतिरिक्त
आयुक्त हर्षल गायकवाड यांची कारवाई
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दिनांक दोन दिवसांपूर्वी झालेल्या महिलेच्या अँब्युलन्सअभावी झालेल्या मृत्यूप्रकरणी केडीएमसी प्रशासनाने हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि वाहनचालकांवर अतिशय कठोर कारवाई केली आहे.
या महिलेला वेळेत दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले असते तर तिच्यावर आवश्यक ते उपचार योग्य वेळेत मिळून तिचा जीव वाचला असता, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने रुग्णालयातील सिस्टर इन चार्ज जयश्री रायकर, वाहन चालक प्रमोद लासूरे, मारुती निकम आणि हरिश्चंद्र यशवंतराव यांच्यावर तत्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर बाह्य संस्थेमार्फत नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. उमर पटेल आणि परिचारिका नमिता भोये यांच्यावर सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे. तसेच रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडूनही या घटनेप्रकरणी खुलासा मागवण्यात आला आहे.
5 मे रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास 43 वर्षीय सविता बिराजदार या आपल्या डाव्या हातामध्ये अशक्तपणाची तक्रार घेऊन रुख्मिणीबाई रुग्णालयाच्या अपघात कक्षात उपचाराकरीता दाखल झाल्या होत्या. यावेळी रुग्णालयातील अपघात कक्ष विभागात बाह्यसंस्थेमार्फत नियुक्त असणारे डॉ. उमेर पटेल यांनी त्यांना तपासले असता सेरिब्रो व्हॅस्क्युलर एक्सीडेंटची शक्यता वाटल्यामुळे त्यांनी रुग्णालयातील तज्ञ फिजिशियन डॉ.निशिकांत शर्मा यांच्याकडे संदर्भित केले. फिजिशियन डॉ. निशिकांत शर्मा यांनी तपासल्यानंतर सविता यांना केईएम रुग्णालय, मुंबई किंवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेऊन पुढील उपचाराचा सल्ला दिला होता. त्यानुसार दुपारी 2 वाजता संदर्भ चिट्ठी देण्यात आली होती. रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेसाठी असलेले शुल्क भरण्याबाबत सूचित केले असता त्यांनी शासनाच्या १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवण्याचा प्रयत्न केला. मात्र १०८ क्रमांकावरून मदतीची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.
.jpg)

Post a Comment
0 Comments