ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कै. स्मिताताई गुरुप्रसाद देशपांडे स्मृतीमंच आणि बल्लाळ बोबडे शैक्षणिक संस्थेच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २०२४- २५ सर्वोत्कृष्ट पुस्तक पुरस्कार बालसाहित्य संकीर्ण विभागामध्ये परदेशी भाषा तज्ञ व खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार ॲड संकेत खर्डीकर यांच्या 'आत्मविश्वास यशाचा पाया' या पुस्तकास कै स्मिता देशपांडे स्मृती पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. या प्रसंगी व्यासपीठावर नगरसेवक श्याम बडोदे, अजिंक्य साने, शिक्षण सेवाव्रती हेरंब गोविलकर, बल्लाळ बोबडे क्लासेसचे संस्थापक प्रा. अविनाश बल्लाळ, प्रकाशक दिलीप व दिपाली बल्लाळ, ज्येष्ठ पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुस्तकाचे लेखक संकेत खर्डीकर हे दूरदृष्टी असलेले युवा व्यक्तिमत्त्व असून ते एक उत्तम शिक्षणतज्ञ, कुशल उद्योजक आणि समाजसेवक आहेत. शैक्षणिक क्षेत्रात नव्या संकल्पना रुजवून विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण व्हावा यादृष्टीने त्यांनी हे नवे पुस्तक लिहले असून पुस्तकास सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी प्रेरणादायी देखील ठरत आहे. विविध क्षेत्रातील अशाच सुप्त कामगिरीबद्दल संकेत खर्डीकर यांस आतापर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी आपला नावलौकिक केला असून जर्मन भाषा शिक्षण आणि सांस्कृतिक आदान प्रदान क्षेत्रातील कार्याची पावती म्हणून एका जर्मन वृत्तपत्राने देखील त्यांची मुलाखत केली होती. नामांकित खर्डीकर क्लासेसचे ते व्यवस्थापकीय संचालक असून उत्तमरीत्या कामकाज पाहत आहेत.
शिक्षण म्हणजे यशाचा महामार्ग आहे. माझे वडील डॉ.सुनील खर्डीकर यांनी याच महामार्गावर चालण्याचे मार्गदर्शन मला लहानपणा पासूनच दिले आहे. आता हाच मार्ग ज्यांना अवघड वाटतो त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे हे मला गरजेचे वाटले. त्यातूनच या साहित्याचा जन्म झाला आणि मी हे पुस्तक लिहले अशा भावना यावेळी लेखक संकेत खर्डीकर यांनी व्यक्त केल्या.
.jpg)


Post a Comment
0 Comments