ब्लॅक अँड व्हाईट बदलापूर वार्ताहर
बदलापुर हेन्द्रे पाड़ा येथे उल्हास नदी पात्रात करण्यात आलेल्या मातीच्या भरावाप्रकरणी अखेर अंबरनाथ तहसिलदार कार्यालयाकडून सत्संग विहार संस्थेच्या व्यवस्थापकांना १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सत्संग विहार यांनी अनधिकृतरित्या उल्हासनदी पात्रात केलेला भराव हा ८ हजार ९१२ ब्रास माती, १९६ ब्रास दगड आणि ८३ ब्रास दगड पावडर इतका आहे. त्यामुळे या गौण खनिजाचा दंड ९ कोटी ९३ लाख ६७ हजार १४१ इतका आहे. तर या भरावासाठी वापरण्यात आलेली यंत्र समुग्रीचा जातमुचलका रक्कम २२ लाख ५० हजार इतकी आहे. हा दंड येत्या सात दिवसात जमा करण्याचे आदेश अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी दिले आहेत.
.jpg)

Post a Comment
0 Comments