Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उल्हासनगर शहरामध्ये 23 कोटी निधी मंज़ूर करुन ट्रान्झीट कॅम्प बनविण्याच्या कामाला वेग..

 

               ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर वार्ताहर 

उल्हासनगर शहरात अतिवृष्टीमुळे, जिर्ण इमारतीच्या दुर्घटनांमुळे बाधीत होणा-या प्रकल्प /दुर्घटना ग्रस्त लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी एकही ट्रान्झीट कॅम्प नसल्याने अशा बाधीतांना महापालिकेच्या शाळा, समाजमंदीर या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येते. परंतू या ठिकाणी स्वच्छतागृह, स्नानगृह नसल्याने त्यांची फार गैरसोय होते. शहरातील इमारती २५ ते ३० वर्षे कालावधीच्या पुर्वीच्या असल्याने इमारतीच्या स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटना सातत्याने घडत असतात.

यासाठी शहरात सुविधांयुक्त असे संक्रमण शिबीर बांधण्याकरीता निधी उपलब्धतेचा प्रस्ताव शासनाकडे दिनांक ०४/११/२०२२ रोजी सादर केला होता.

त्याअनुषंगाने, १५ व्या वित्त आयोगाने महाराष्ट्र राज्यासाठी राज्य आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत प्रकल्प मुल्यमापन समिती व तांत्रिक मुल्यमापन समिती ने शिफारस केलेल्या तसेच दिनांक १३/०८/२०२४ रोजीच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाच्या बैठकीमध्ये उल्हासनगर शहराकरीता तेजुमल चक्की येथे बेघर निवारा केंद्र बांधणेकरीता रु.३.०० कोटी  व वाल्मीकीनगर येथे संक्रमण शिबीर बांधणेकरीता रु.२०.०० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

वरील कामास शासन स्तरावर प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे. सदर कामाची शासनस्तरावरच निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. मे. ब्रेथलेट अँड कंपनी लि. या सार्वजनिक उपक्रम कंपनीला दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी कामाचे कार्यादेश निर्गमित करण्यात आले आहे. जागेचे रेखांकन झाल्यानंतर कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

अशी माहिती उल्हासनगर महानगर पालिका प्रशासना तर्फे पुर्व उमनपा नगरसेवक व लोकशाही दिनी ट्रांज़िट कैम्प ची मागणी घेऊन मनपा आयुक्त दालना बाहेर बसलेले उपोषणकर्ते श्री सतरामदास जेसवानी यांना दिली आहे.

Post a Comment

0 Comments