अंबरनाथ नगरपरिषदेचा हा उपक्रम अन्य शहरी भागांसाठी प्रेरणादायी ठरत असून, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून ही कामगिरी उल्लेखनीय आहे.
ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर
अंबरनाथ नगरपरिषद अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शहरी बेघर निवाऱ्याची यशस्वी अंमलबजावणी सध्या राज्यभरात कौतुकास पात्र ठरत आहे. सध्या या निवाऱ्यात 36 बेघर लाभार्थ्यांना मोफत निवास, जेवण व सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात येत असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
या उपक्रमामुळे अंबरनाथमधील बेघर नागरिकांना सुरक्षित आणि सन्मानजनक जीवनशैली प्राप्त झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल मा. राज्यसह नियंत्रण समितीने घेतली असून, महाराष्ट्रातील पाच सर्वोत्कृष्ट शहरी बेघर निवाऱ्यांमध्ये अंबरनाथची निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड, बीड, अकोला, अंबरनाथ व बृहन्मुंबई या निवाऱ्यांनी घेतलेले कष्ट व सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच ही निवड शक्य झाली.
या यशस्वी अंमलबजावणीमागे मा. उमाकांत गायकवाड साहेबांचे लाभलेले मार्गदर्शन व सहकार्य हे अत्यंत मोलाचे ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच निवाऱ्याच्या व्यवस्थापनाची गुणवत्ता उंचावली असून, लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता आला आहे.अंबरनाथ नगरपरिषदेचा हा उपक्रम अन्य शहरी भागांसाठी प्रेरणादायी ठरत असून, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून ही कामगिरी उल्लेखनीय आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments