Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उरण येथे रक्तदान शिबिरात 60 निरंकारी भक्तांचे रक्तदान


                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने रविवारी उरण येथील संत निरंकारी सत्संग भवन, हनुमान कोळीवाडा येथे  रक्तदान शिबिराचे आयोजन केले. निष्काम सेवा आणि समर्पणाचे प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत करत या शिबिरामध्ये ६० निरंकारी भक्तांनी उत्साहाने रक्तदान केले. रक्त संकलनाची प्रक्रिया संत निरंकारी ब्लड बँक, विलेपार्ले यांच्या माध्यमातून पार पडली.


या मानवतावादी उपक्रमात संत निरंकारी मिशनच्या उरण परिसरातील स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली. जवळपास १५० भक्तांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती, ज्यातून मिशनच्या शिकवणीत अंतर्भूत असलेली स्वयंसेवेची भावना प्रकर्षाने जाणवते. या शिबिराचा शुभारंभ सेक्टर संयोजक दत्ता पाटील आणि संत निरंकारी रक्तपेढीचे  मारुती कासारे यांच्या उपस्थितीत निरंकार प्रभूप्रति प्रार्थना करून करण्यात आला.
     स्थानिक मुखी अनंत शेनॉय यांच्या देखरेखी खाली स्थानिक सेवा दल आणि संत निरंकारी चॅरटेबल फाउंडेशनचे सदस्य यांच्या सहयोगाने यशस्वीपणे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments