Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कोळसेवाडी पोलीसांनी उघडकीस आणले मोटार सायकल चोरीचे गुन्हे


                        ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

१२ मे २०२५ रोजी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये अॅक्टीवा स्कुटर चोरीचा गुन्हा दाखल होता. वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमी वरून आंबीवली, कल्याण येथुन गुन्हयातील आरोपी करण गायकवाड, वय २२ वर्षे, यास गुन्हयात चोरीस गेलेल्या ४० हजार रू किमतीची लाल रंगाच्या स्कुटीसह ताब्यात घेतले असून त्याने हा गुन्हा केल्याची कबुली देवुन त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता  त्याने विष्णूनगर पोलीस स्टेशन, डोंबीवली पश्चिम हददीतुन दोन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली असुन अधिक तपास सुरू आहे.

हि कामगिरी पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे व सहा. पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि  दर्शन पाटील, पोहवा  राजेश कापडी, भागवत सौंदाणे, मिंलीद बोरसे, शांताराम सांगळे, भगवान सांगळे, पोशि  दिलीप सोनावळे यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments