ब्लॅक अँड व्हाईट कल्याण प्रतिनिधी
सामाजिक,शैक्षणिक, कला या क्षेत्रातील कामाची दखल घेऊन जाॅय सामाजिक संस्था मुंबई यांनी कल्याणच्या साहित्यिक अनिता प्रविण कळसकर यांना आदर्श समाजसेविका म्हणून पुरस्कार जाहीर केला आहे.हा पुरस्कार जूनच्या ७ तारखेला मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे.या अगोदर अनिता ताईंना साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.जाॅय सामाजिक संस्थेच्या ७व्या वर्धापन दिनानिमित्त हा आदर्श समाजसेविका पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. त्यामुळे सर्वच मित्र परिवाराकडून अनिता ताईंवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments