आयरे गावात अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ग प्रभाग अंतर्गत, दिनांक २९ मे २०२५ रोजी आयरे गावात गटार व नाल्याच्या साफसफाईसंदर्भात प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी निरीक्षण व पाहणी केली, यादरम्यान संबंधित परिसरात अनधिकृत चाळीचे बांधकाम आढळून आले.
पाहणीवेळी महापालिकेच्या ग प्रभागाच्या पथकास १५ जोत्यांचे (फाउंडेशन) बांधकाम व ५ पूर्ण झालेल्या खोल्यांचे अनधिकृत बांधकाम निदर्शनास आले. सदर बांधकाम सार्वजनिक गटार व नाल्यावर अतिक्रमण करून करण्यात आले होते, त्यामुळे
महापालिकेच्या ग प्रभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे त्वरित निष्कासन कारवाई करून हे अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात आले आणि परिसरात स्वच्छता व मोकळेपणा राखण्यात आलेला आहे.
महापालिकेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम वा अतिक्रमण सहन केले जाणार नाही आणि याविरोधात सातत्याने कठोर पावले उचलली जातील.
.jpg)

Post a Comment
0 Comments