Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

माणेरे गावातील दोन बोगस डॉक्टरांवर अखेर गुन्हा दाखल


                        ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरोधात केलेल्या कारवाईत माणेरे येथील दोन बोगस डॉक्टरां विरोधात गुन्हा दाखल करण्यास तब्बल सव्वा वर्षोचा कालावधी लागल्याने केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे.                                 

माणेरे गावातील श्री साई क्लिनिक येथे दोन अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने ७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता महापालिकेच्या बोगस डॉक्टर शोध पथकाने श्री साई क्लिनिक येथे धाड टाकली. यावेळी श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी हे व्यक्ती वैद्यकीय पात्रता नसतानाही रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळून आले. तपासात असे निष्पन्न झाले की श्रीकृष्ण कुमावत यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नाही. तर देवेंद्र पुजारी यांच्याकडे "इलेक्ट्रो होमिओपथी" ही अर्हता असून, ती पद्धत शासनमान्य नसल्यामुळे अशा अर्हताधारकांना वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी नाही.

या दोघांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 19मे 2025रोजी केडीएमसी मुख्य आरोग्य आधिकारी यांनी दिलेल्या तक्रीरीनुसार  पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१  मधील कलम ३३ व ३६ तसेच भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ मधील कलम ३१८ व ३१९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.

केडीएमसी मुख्य आरोग्य आधिकारी डॉ. दिपा शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माणेरे येथील दोन बोगस डॉक्टरांविरोधात 19मे 2025रोजी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला गेला असून याप्रकरणी सव्वा वर्षोचा विलंब हा पुनश्च व्हिजिट, मेडिकल काँन्सिलकडे  कागदपत्र तपासणी यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला." प्रशासनाच्या या दिरंगाई धोरणामुळे दिरंगाई दरम्यान त्या दोन बोगस डॉक्टरांनी रुग्णांवर  उपचार केले असतील तर ते दुर्दैवेच म्हणावे लागेल. आरोग्य विभागाच्या दिरंगाई सावळा गोधंळ कारभाराच्या फटकामुळे रुग्णांचा जीव टागंणीला असा आरोप यानिमित्ताने होत आहे.


Post a Comment

0 Comments