ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण शीळ मार्गावरील पलावा येथील अर्धवट पुलाच्या कामा विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसेचे जोरदार निषेध आंदोलन केल्याने राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची नांदी या आंदोलना मुळे दिसून आले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उत्साहाने सत्ताधारी पक्षा विरोधात नागरी प्रश्ना बाबत रस्त्यावर उतरल्याने भवितव्यात दोन्ही पक्ष एकत्रित पालिका निवडणुकी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, डोंबिवली व कल्याण ग्रामीण विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कल्याण-शीळ मार्गावरील पलावा येथे मागील आठ वर्षांपासून अर्धवट लटकलेल्या व बंद पडलेल्या पुलाच्या कामाविरोधात जोरदार निषेध आंदोलन केले.
या अर्धवट पुलामुळे परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते असून, त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्राफिक कोंडीमुळे कधी कधी शाळेच्या प्रशासनाला सुट्टी देखील देण्याची वेळ आली आहे. या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे तासांतास नागरिकांना या वाहतूक कोंडीत अटकून राहावे लागते. नागरिकांना सत्ताधारी पक्षाकडून या पुलाच्या उद्घाटना बाबत यापूर्वी अनेक वेळा खोट्या तारखा सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात आली. ३१ मे रोजी पूल सुरू होईल, असे दिलेले आश्वासन देखील अपूर्ण राहिले. ही गंभीर फसवणूक लक्षात घेता, नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आल्याचे सांगितले .
या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद ( राजू) पाटील तसेच मनसेचे डोंबिवली, कल्याण ग्रामीण विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनं बाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांनी सांगितले की ही लढाई कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून, सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठीची आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र लढण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दात टीका करीत "सामान्य जनतेसाठी आम्ही सदैव एकत्र आहोत असे सांगितले.
.jpg)



Post a Comment
0 Comments