Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

निरंकारी भक्तगणांकडून समर्पण दिवसानिमित्त बाबा हरदेवसिंहजी यांना श्रद्धा सुमने अर्पित

       



                        ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

संत निरंकारी मिशनच्या वतीने समर्पण दिवसाचे औचित्य साधून युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ एक भावपूर्ण वर्चुअल संत समागम आयोजित करण्यात आला. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिताजी  यांच्या उपस्थितीत 13 मे रोजी आयोजित केलेल्या या समागमात देशविदेशातून लाखो श्रद्धाळूंनी ऑनलाइन सहभाग घेतला.

समर्पण दिवसाच्या निमित्ताने मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये सुमारे 60 ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले आणि त्याद्वारे बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या दिव्य जीवनातून व शिकवणूकीतून प्रेरणा प्राप्त करण्यात आली.





या दिवशी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी वर्चुअल सत्संगाद्वारे श्रद्धाळू भक्तगणांना संबोधित करताना सांगितले की सतगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज  यांचे जीवन क्षणोक्षणी प्रेम, त्याग, सेवा आणि दिव्य शिकवणूकींनी परिपूर्ण होते. असेच भक्तिभावाचे समर्पित जीवन आपलेही व्हावे, असे त्यांनी प्रतिपादन केले. समर्पण फक्त शब्दांत न राहता ते आचरणात उतरायला हवे. या प्रसंगी भाविक भक्तगणांनी आपले विचार, गीत, कविता आणि भजनांच्या माध्यमातून बाबाजींच्या करुणा, प्रेम व समर्पणाची अनुभूती पुन्हा जिवंत केली.

सतगुरु माताजींनी श्रद्धेय अवनीतजी  यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करताना त्यांना एक खरा गुरसिख म्हटले, ज्यांनी आपल्या आचरणातून समर्पणाचा आदर्श उभा केला. समर्पण दिवसाच्या या व्हर्च्युअल संत समागमामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन हस्ते ‘हरदेव वचनामृत’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. हे एक सुसंगत व सारगर्भित संकलन आहे, ज्यामध्ये बाबा बाबा हरदेवसिंहजी यांचे दिव्य विचार, उपदेश आणि वचने एकत्रित करण्यात आली आहेत.

आज सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज, बाबाजींची शिकवण पुढे घेऊन जात असून ब्रह्मज्ञानाच्या दिव्य प्रकाशाने संपूर्ण मानवतेला उजळवत आहेत.


Post a Comment

0 Comments