Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्रामाणिक सामान्य माणसाच्या असामान्य गोष्टीची कहाणी

              ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर

अंबरनाथ नगर परिषदेमध्ये चतुर्दश्रेणी कर्मचारी श्री. शैलेश साळुंखे यांनी Global Powerlifting Bodyliftinng International Championship, Dubai येथे 98 किलो वजनी गटात स्कॉड्स ,बेंच प्रेस, पावर लिफ्टिंग मध्ये प्रथम पारितोषिक पटकावले आहे श्री शैलेश साळुंखे हे गेली 30 वर्ष अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नोकरी करत आहे नोकरी करत असताना देखील त्यांनी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी निर्माण केले आणि या संधीमध्ये त्यांना माननीय मुख्याधिकारी श्री उमाकांत गायकवाड यांच्याकडून कायम प्रोत्साहन  मिळाले. 

आता पटकावलेल्या पारितोषिकमुळे त्यांना मिनी ऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळाली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी त्यांचे अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने कौतुक केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.

Post a Comment

0 Comments