ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा
महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगर पंचायतींची निवडणूक प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशाप्रकारे, कोरोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत.
दरम्यान आता निवडणूक आयोगाने देखील याबाबत महत्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता निवडणुक आयोगाने राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत यांच्या प्रभाग रचना तयार करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यसाठी गणांची रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आता ही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. अखेर 6 मे रोजी सुप्रीम कोर्टाने याबाबत निकाल दिला.
.jpg)

Post a Comment
0 Comments