ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊन यांच्या वतीने दरवर्षी नऊ "उत्कृष्ट मातांचा" सत्कार करण्याचा हा १६ वा वर्धापनदिन आहे.
अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास करणाऱ्या तसेच समाजामध्ये असामान्य ठसा उमटवणाऱ्या मातांचा माहेरची साडी, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तरी अशा इच्छुक मातांनी आपली योग्य माहिती संजीवनी हॉस्पिटल, रामनगर पोलीस स्टेशनजवळ, राजाजी रोड, डोंबिवली पूर्व येथे शुक्रवार, दिनांक ३० मे पर्यंत पोहोचती करावी, ही नम्र विनंती.
संपर्क: रोटेरियन राहुल देहरकर ९८२०३५४५४१, रोटेरियन योगेश ९८२१०६२६९४ आणि डॉ. अरुण पाटील ९८१९२२४७५३.
.jpg)

Post a Comment
0 Comments