विविध विभागांना राज्यस्तरीय पुरस्कार
ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
"मिशन 100 डेज" या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी करत विविध विभागांनी उत्कृष्टतेची शिखरं गाठली आहेत. या मोहिमेतील कामगिरीच्या आधारावर ठाणे जिल्ह्याच्या विभागांना मानांकन मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली १०० दिवस कृती कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. तसेच विजेत्या सर्व विभागांचे अभिनंदन घुगे यांनी केले आहे.
* गटविकास अधिकारी, शहापूर – द्वितीय क्रमांक
* तालुका वैद्यकीय अधिकारी, भिवंडी – तृतीय क्रमांक
* बालविकास प्रकल्प अधिकारी, भिवंडी – प्रथम क्रमांक
* पशुधन विकास अधिकारी, शहापूर – तृतीय क्रमांक
* गटशिक्षणाधिकारी, कल्याण – प्रथम क्रमांक
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
"मिशन 100 डेज" अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील विविध विभागांनी केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. हे यश म्हणजे नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि सेवाभाव यांचे प्रतिक आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देते."....मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे .
या यशाबद्दल ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वच पातळ्यांवरून अभिनंदन करण्यात येत आहे.
०००
.jpg)

Post a Comment
0 Comments