Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

माजी नगरसेवक शरद पावशे यांचा वाढदिवस समाज कार्यातून साजरा

 

“लोकांचे सुखदुःख हेच आपले कर्तव्य” या तत्त्वावर काम करणारे शरद पावशे हे आजही कोणत्याही प्रसंगात सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी तत्पर असतात. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाला अशी उत्स्फूर्त गर्दी झाली, जणू काही हा वाढदिवस नव्हेच – तर एक सामाजिक उत्सवच झाला.

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

माजी नगरसेवक शरद पावशे  यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी दिसून आली.कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने – केक कापून करण्यात आली, आणि या क्षणाला साक्षीदार राहण्यासाठी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, महिला मंडळ, युवा वर्ग आणि विशेषतः विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद हेच शरद पावशे यांच्या कार्याचं जिवंत उदाहरण होतं. यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधात समाजोपयोगी उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं. दिवसभर त्यांच्या कार्यालयात विविध उपक्रम राबवले गेले – काही आरोग्यविषयक, काही सामाजिक, तर काही गरजूंना मदतीचे हात देणे .

“लोकांचे सुखदुःख हेच आपले कर्तव्य” या तत्त्वावर काम करणारे शरद पावशे हे आजही कोणत्याही प्रसंगात सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी तत्पर असतात. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाला अशी उत्स्फूर्त गर्दी झाली, जणू काही हा वाढदिवस नव्हेच – तर एक सामाजिक उत्सवच झाला.

या मंचावरून शरद पावशे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देताना, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदैव अशीच लोकांची साथ लाभो, हीच प्रार्थना! तसेच या कार्यक्रमात प्रसंगी विशेष म्हणजे यावेळी  मित्र परिवार, त्याचा परिसरातील जेष्ठ नागरिक, आजी माजी नगरसेवक , सामाजिक, शैक्षणिक, मेडिकल, उद्योजक, समाजसेवक, कार्यकर्ते , पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments