Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी घेतला मान्सूनपूर्व कामांचा आढावा


                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात मान्सूनपूर्व तयारी संदर्भातील आढावा बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत शहरातील विविध प्रभागांमध्ये येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांबाबत सखोल चर्चा झाली. या बैठकीत आयुक्तांनी लवकरात लवकर नाले सफाई पूर्ण करून त्यामध्ये वाढलेला गाळ प्राथमिक टप्प्यातच उचलण्याचे निर्देश दिले. तसेच मोठ्या, मध्यम नाल्यांबरोबरच लहान गटारांच्या जवळील जीव्हीपी ठिकाणी दैनंदिन स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले.

पावसाचे पाणी ज्या भागांमध्ये साचते असे भाग लक्षात घेऊन, त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र प्रभाग पातळीवर विशेष टीम तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यामुळे पावसाळ्यात महापालिका क्षेत्रात पाणी साचण्याच्या समस्या कमी होतील, असे आयुक्तांनी सूचित केले. महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी या सूचनांची अंमलबजावणी तत्काळ सुरू करावी, असे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकारांना दिले.



Post a Comment

0 Comments