भाजपा पदाधिकारी सुशिलकुमार पायाळ यांचे
परिवहन व्यवस्थापकांना निवेदन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत “अ” प्रभाक्षेत्रातील मार्गांवर वातानुकूलित ई - बसेसची सेवा सुरू करण्याची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली असून याबाबत भाजपा पदाधिकारी सुशिलकुमार पायाळ यांनी परिवहन व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत कल्याण डोंबिवली शहरांमध्ये दळणवळणासाठी बसेसची सुविधा उपलब्ध आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण या धोरण अंतर्गत ई-बसेस ची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने अर्थसहाय्य केलेले असून केलेल्या अर्थसाहयातून पालिका प्रशासनाने ई-बसेसची खरेदी केली आहे. त्यामुळे अ प्रभाग क्षेत्रातील सुरू असलेली परिवहन व्यवस्था मोडकळीस आलेली असताना मोहने गाळेगाव आणि सभोवतालच्या परिसरातील नागरिकांनी माफक इच्छा दर्शवलेली आहे की, “अ” प्रभाग क्षेत्रात सुरू असलेल्या परिवहन व्यवस्थेमध्ये वातानुकूलित ई बसेसचा समावेश करून उन्हाळ्याच्या गर्मी पासून नागरिकांना आराम मिळावा.
तरी या विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना अ प्रभाग क्षेत्रात वातानुकूलित ई बसेस सुरू करणे बाबत सूचना कराव्यात अन्यथा ऐन उन्हाळ्याच्या मोसमा मध्ये नागरिक परिवहन विभागाचा निषेध नोंदवण्यासाठी व आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी पालिका प्रशासनाच्या आवारामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा सुशिलकुमार पायाळ यांनी दिला आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments