Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट हुकले

 

31 मार्च पर्यंत 453.06 कोटींची वसूली   47  कोटीच्या फरकामुळे 500 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट हुकले

             

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 


कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने २०२४-२०२५ मध्ये मालमत्ता कर वसुलीचे सुधारीत अंदाज ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले होते.  पंरतु सुमारे  47 कोटी  94 लक्ष रू मालमत्ता कर उद्दिष्ट कमी पडल्यामुळे 500कोटी वसूली उद्दिष्ट प्रशासन गाठू  शकले नाही.             

केडीएमसीच्या महसुली उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत मालमत्ता कर आहे. केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्वतः लक्ष घालून सर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त व कर अधिक्षक यांच्या समवेत कर वसूलीबाबत सतत आढावा बैठक घेवून कर वसुली करण्याबाबत मार्गदर्शन केले. आयुक्त यांच्या प्रोत्साहनपर व प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे सर्व प्रभागातील सहाय्यक आयुक्त व कर अधिक्षक यांच्यातील उत्साह वाढून त्याचे फलीत म्हणून ३१ मार्च २०२५ अखेर मालमत्ता कराची निव्वळ रक्कम रु.४५३.०६ फी वसूली झाली. यानिमित्ताने

महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मालमत्ता कराचा वेळेत भरणा केल्याबद्दल मनपाने  सर्व करदात्यांचे प्रशासनाने  आभार मानले आहेत.

 


Post a Comment

0 Comments