ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
भक्ती-शक्तीचे प्रतीक महाबली श्री हनुमान जयंती शनिवारी सर्वत्र जल्लोषात साजरी झाली. कल्याण तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या वाघेरापाडा येथे ४० वर्षे जुन्या मंदिरात आदीवासी बांधवांनी पूजा, आरती करून जन्मोत्सव साजरा केला.वाघेरापाडा वस्तीतील हे सर्वात जुने आणि एकमेव मंदिर आहे. मंदिर शेतीला लागून असल्याने येथील शेतकरी बाळाराम शिद आणि इतर शेतकरी बांधवांची भक्तीची नाळ आस्थेने जोडली गेली आहे. पूजाविधीसह मंदिर आणि परिसराची निगा ते नेकीने राखत आले आहेत. आदीवासी बांधव त्यांची परंपरा आजही जपत असून शेतीची कामे सुरु करण्यापूर्वी मंदिरातील जागृत देवाची भक्तिभावाने पूजा, यात्रा भरवल्या जातात. चांगले आणि मुबलक पीक यावे यासाठी इथल्या देवाला साकडे घालण्याची प्रथा आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments