माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या पाठपुराव्याला यश
आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून होणार रस्त्याचे काम
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा प्रभागात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक 29 ठाणकर पाडा परिसरातील महावीर जैन स्कुल ते शंकर काँलनी टेलिफोन कार्यालयापर्यन्त सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना उपशहर प्रमुख तथा स्थानिक माजी नगरसेवक मोहन उगले यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या हस्ते या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक मोहन उगले, विभाग प्रमुख अनंता पगार, उपविभाग प्रमुख स्वप्निल मोरे, शाखा प्रमुख नितीन कदम, शरद आव्हाड, उपशाखा प्रमुख उमेश भुजबळ, महिला शहर संघटक नेत्रा उगले, उपशहर प्रमुख कल्पना जमदाडे, आशा रसाळ, महिला शाखा प्रमुख ज्योती पाटील, भारती पवार यांच्यासह ठाणकर पाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी सांगितले की आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून 70मीटर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाचा बनविला होता, व उर्वरीत रस्ता बाकी होता. तो देखिल रस्ता पूर्ण करण्याचे काम मोहन उगले हे करतील यासाठी येथील रहिवाशांनी मोहन उगले यांच्याकडे वारंवार विचारणी केली होती. उगले यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कडे रस्त्याच्या कामाच्या बाबत निधीची मागणी केली.
त्या प्रमाणे आमदार निधीतून सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या साठी निधी मंजूर करण्यात आला व लगेच कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मतदारांनी आपल्याला निवडून दिले आहे, आपल्यावर विश्वास ठेवला आहे, त्या प्रमाणे विकास कामे केली पाहिजेत, नेत्यांनी कार्यकर्त्याना सहकार्य केले पाहिजे, म्हणजे कार्यकर्ते मोठे झाले तर नेतेही मोठे होतील असे सांगितले.
.jpg)


Post a Comment
0 Comments