ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सकल हिंदू समाजाच्या वतीने कल्याण पूर्व मध्ये श्री रामनवमी निमित्ताने भव्य शोभायात्रा 6एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेला कल्याण पूर्व विठ्ठलवाडी बस डेपो पासून सुरुवात होणार असून चक्की नाका येथे समाप्ती होणार आहे.
यावेळीअध्यक्ष हेमंत दरगोडे यांनी सांगितले की तीन वर्षांपासून आम्ही रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढत आहोत. यावर्षी देखील हि शोभायात्रा विठ्ठलवाडी बस डेपोपासून सुरू होऊन ते पुढे काटेमानीवली नाका, तिसगाव नाका आणि चक्की नाका गुणगोपाल मंदिर याठिकाणी समाप्ती होणार आहे.
या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात बहुसंख्येने रामभक्त एकत्र आलेले असतात. संपूर्ण कल्याण पूर्वेतील रामभक्तांना एकत्र आणणार हे व्यासपीठ आहे. या स्वागत समितीचे वैशिष्ट्य असं आहे की या स्वागत समितीवर सामान्य लोक एकत्र येऊन त्यांनी हे काम केलेलं आहे. या समितीचे प्रमुख उद्दिष्ट जर काही असेल ते हिंदू धर्माचं जागरण आणि प्रसारण करणे हे आहे.
रामनवमीच्या स्वागत समितीचे अध्यक्षपद दीपक गुप्ता यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे. कल्याण पूर्वेतील सर्वांनी रामनवमी शोभायात्रा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments