Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साप्ताहिक कल्याण प्रजाराजचा ३०वा वर्धापन दिन संपन्न

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कथाकार, पत्रकार आणि कलाकार हे आपल्या समाजाचे तीन विभिन्न अंग आहे हे तिन्ही अंग आपली जबाबदारी,भूमिका, सात्विक, आणि पुरुषार्थ करून बजावतील तर आपला समाज तंदुरस्त व समुद्ध होऊन समाजाचा विकास होईल असे मत भागवताचार्य पू. भूपेंद्रभाई पंड्या यांनी कल्याण येथे व्यक्त केले. के.सी. गांधी स्कूल ओडीटोरीयम येथे आयोजित साप्ताहिक कल्याण प्रजाराजच्या ३०वा वर्धापनदिन सोहळ्यात अध्यक्ष स्थानी ते बोलत होते. 



कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. ह्या प्रसंगी संपादक रवि चौधरी यांनी ३० वर्षाची कल्याण प्रजाराजच्या वाढचाल संबंधित माहिती दिली.  पू. भूपेंद्रभाई पंड्या यांच्या हस्ते कल्याण प्रजाराजच्या ३०वा वर्धापन अंकाचे प्रकाशन करण्यात आले.


या कार्यक्रमात आमदार विश्वनाथ भोईर, आमदार सुलभा गायकवाड, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, कल्याण प्रजाराजचे संपादक रवि चौधरी, व्यापारी अग्रणी प्रेमजी गाला, दिपक पोपट, भूषण कारीया, केतन पटेल, व रमेश पटेल सहीत मोठी संख्येने व्यापारी उपस्थित होते.
या समारंभात आमदार विश्वनाथ भोईर व सुलभा गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले व कल्याण प्रजाराजला शुभेच्छा दिल्या. प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले की ३० वर्ष वृत्तसेवा नियमितपणे चालवून एक प्रकारे समाजाची ३ दशक सेवा केली आहे. भूपेंद्रभाई हे पुढे म्हणाले की सातत्य, सात्विकता, सहरुदयता आणि समर्पित भावनेने कल्याण प्रजाराजनी ३० वर्षाची अविरत यात्रा पूर्ण होऊन ३१ वा वर्षात पदार्पण केले आहे हे गौरव करण्या सारखे आहे. या कामी चौधरी परीवाराच्या तिन पिंढ्यांनी मेहेनत घेतली आहे.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रो.भरत लिबड यांनी केले व आभार प्रदर्शन विष्णूकुमार चौधरी यांनी केले. या प्रसंगी प्रतिष्ठित व्यापारी व लेखक, पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments