Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जनता दरबारमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना धनादेशाचे वितरण कंपनी

 

आमदार सुलभा गायकवाड यांनी लोकांच्या समस्या घेतल्या ऐकून

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण पूर्वेकडील तिसाई हाऊस येथे रविवार, २० एप्रिल रोजी जनता दरबाराचे आयोजन भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्या वतीने  करण्यात आले होते.  या जनता दरबारात स्थानिक आमदार  सुलभा गायकवाड यांनी शिक्षणापासून वंचित न राहण्यासाठी गरजू, गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना धनादेश  देत मदत केली. 


जनता दरबारमध्ये लोकांनी, तसेच नागरिकांनी  आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या समोर एक एक करून त्यांच्या समस्या सांगितल्या. काहींनी गटार स्वच्छतेबद्दल तक्रार केली, तर काहींनी पाण्याबद्दल तक्रार केली. जनता दरबारात स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या ऐकल्या आणि त्या शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला. जाईल असे आश्वासन दिले. छोट्या छोट्या समस्यांसाठी त्यांनी स्वतः अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या लवकरात लवकर सोडवण्यास सांगितले. मतदारसंघातील महिलांपासून ते वृद्धांपर्यंत, सर्वजण त्यांच्या समस्या घेऊन जनता दरबारात या प्रसंगी आले. असल्याचे दिसत होते.                 
        जनता दरबारा निमित्ताने आमदार सुलभा गायकवाड यांनी महिलांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले. या जनता दरबारा निमित्ताने आमदार  सुलभा  गायकवाड यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,  मतदारसंघातील नागरिकांसाठी दर रविवारी जनता दरबार आयोजित केला जातो, जो माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकाळापासून सुरू आहे. रविवारी जनता दरबारात विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते  त्यांनी आपल्या समोर आपल्या समस्या मांडल्या.          तसेच,सामाजातील गोर,गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी मदत करण्यात आली, जेणेकरून पैशाअभावी शिक्षणात खंड पडू नये.


Post a Comment

0 Comments