Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीत वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन

 

         ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली  (विद्या कुलकर्णी)

डोंबिवली येथील रिजन्सी अनंतम्  संकुलातील १८ नंबर बिल्डिंग येथे विवाहासाठी इच्छुक सर्वजातीतील वधूवरांसाठी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन रिजन्सी अनंतम् लावण्यवती महिला मंडळातर्फे करण्यात आले होते.त्यात ५५ वधूवरांनी नोंदणी केलेली होती .त्यात डांक्टर ,इंजिनिअर ,व्यावसायिक, इस्त्रो मधील उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी, बॅंकेतील अधिकारी कर्मचारी ,वकील या सर्वांचा समावेश होता.समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांना अनुरूप स्थळ शोधून विवाह जुळवण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळाली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर मंडळाच्या विद्या कुलकर्णी यांनी या रजिस्टर्ड मंडळाचे विविध उपक्रम सर्वांसमोर मांडले.व  वधू वर परिचय मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला.संध्या  शिंदे यांनी लग्नाआधी मेडिकल चेक अपचे महत्त्व सांगितले.त्यानंतर सोनाली सदंनशिव ,हर्षदा पाठक यांनी वधूवरांच्या परिचयाचा कार्यक्रम खूपच सुंदर घेतला.”या मेळाव्याच्या निमित्ताने एका छताखाली एकमेकांशी मॅच होणारी स्थळे शोधणे सोपे झाले.समोरासमोर बसून बोलल्यामुळे त्यांना हवी ती माहिती मिळाली पसंदीच्या स्थळांशी संपर्क करता आला.बराच वेळ वाचला.”अशी प्रतिक्रिया परदेशातून शिक्षण घेतलेल्या कौस्तुभ कार्ले यांनी दिली.वर्षातून तीनदा तरी असे मेळावे भरवावीत अशीही प्रतिक्रिया मिळाली.

पालक  व वधू वरांनी आप आपली मते मांडली.विवाह जुळल्यानंतर मंडळाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.प्रियांका आंब्रे,अंजली इंगोले,संध्या शिंदे यांनी मेळाव्यासाठी खूप मेहनत घेतली.अल्पोपहारा नंतर या गेट टूगेदरची  अविस्मरणीय मेळाव्याची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments