ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम 2015 बाबत जास्तीत जास्त नागरिकांना माहिती उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने शासनाने दि. 28 एप्रिल हा दिवस "सेवा हक्क दिन" म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिका मुख्यालयात सेवा हक्क दिनानिमित्त महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, उप आयुक्त वंदना गुळवे, रमेश मिसाळ, स्वाती देशपांडे, प्रसाद बोरकर, संजय जाधव, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, इतर अधिकारी वर्ग व महापालिका कर्मचारी वर्ग तसेच विविध संस्थाचे प्रतिनिधी, नागरिक यांनी सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने शपथ ग्रहण केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, उप आयुक्त वंदना गुळवे यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम 2015 बाबत उपस्थितांना माहिती विषद केली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकुण 114 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, यापैकी 33 सेवा नागरिकांसाठी पुर्णपणे ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध आहेत आणि उर्वरित सेवा पुर्णपणे ऑनलाईन करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. या सेवा कालबध्द पध्दतीने देणे गरजेचे असून, याबाबत दि. 2 एप्रिल 2025 रोजी पदनिर्देशीत अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी, व्दितीय अपिलीय अधिकारी यांस प्रशिक्षण देण्यात आले असून, लवकरच द्वितीय प्रशिक्षण देखील संबंधित अधिकारी वर्गास देण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे यांनी यावेळी दिली.
यासमयी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणातील डिजीटल स्टँन्डीवर महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम 2015 बाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे उपलब्ध सेवांची माहिती प्रदर्शित करण्यात आली.
महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये सेवा हक्क दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. तसेच महापालिका परिक्षेत्रातील शाळांमध्ये देखील शिक्षक व विद्यार्थी वर्गामध्ये सेवा हक्क दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे सदर अधिनियमाच्या जनजागृतीसाठी महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विविध शाळांमध्ये निबंध व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments