ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर प्रतिनिधी
उल्हासनगर कैम्प 4 चे 76 वर्षीय वरिष्ठ नागरिक रहिवासित सुभाष दिनकर पाटील जे माजी सैनिक आहेत, त्यांनी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनास पत्र देऊन सांगितले आहे कि, 8 दिवसात नाला दुरुस्ती चे काम सुरु न झाल्यास 1 मे महाराष्ट्र दिनापासुन आमरण उपोषणास बसणार.
श्री सुभाष दिनकर पाटील यांचे घराच्या बाजूला एक मोठा नाला आहे जो २००७ साली बनवण्यात आला होता. तो नाला हळू हळू आता संपूर्ण पणे पडण्याच्या मार्गावर आला आहे. गेल्या ७ वर्षांपासून महापालिकेला वा स्थानिक नगरसेवकला वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा तो नाला दुरुस्त करण्यात आला नाही ज्याचा परिणाम दिनांक २३ जुलै २०१९ साली मुसळधार पावसात त्यांच्या कारखान्याची भिंत पडून ६ ते ७ लाखाचे नुकसान झाले होते, तसेच त्यानंतर पण सलग ३ पावसाळ्यात नाल्याच्या दुसऱ्या बाजू येथील २ घरांची भिंत तसेच समोरील बिल्डिंग ची भिंत पडून त्यांचे पण लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. उमनपा सार्वजनिक बांधकाम विभाग व आयुक्त याना वारंवार तक्रार करण्यात आली परंतु तो नाला अजून ही बनवण्यात आला नाही आहे.
"म्हणुन येत्या 8 दिवसात जर नाल्याचे काम सुरु न झाल्यास मी व माझा मुलगा माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सोमवार दिनांकः ०१ मे २०२५ (महाराष्ट्र दिन) रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून राहत्या घरी आमरण उपोषणास बसत आहे. तसेच या काळात नाला दुरुस्त न झाल्यामुळे कुठलीही दुर्घटना घडली तर याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असेल."
अश्या प्रकारचे पत्र 76 वर्षीय श्री सुभाष दिनकर पाटील माजी सैनिक यानी उमनपा प्रशासन व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे याना दिले आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments