Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मेल एक्स्प्रेस मध्ये महिला प्रवाशांचे किंमती ऐवज चोरणारा चोरटा जेरबंद

 

मेल एक्स्प्रेस मध्ये महिला प्रवाशांचे किंमती ऐवज चोरणारा चोरटा जेरबंद

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

मेल एक्स्प्रेस मध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांचा किंमती ऐवज चोरणाऱ्यां  एका चोराला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना कल्याण, वसई दरम्यान वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठाच्या मार्गदर्शन खाली  गुन्हे शाखा युनिट-3कल्याणलोहमार्गमुंबई पथकाने तपास सुरू केला. त्यानुसार कल्याणात रेल्वे चोरी प्रकरणी रेकॉर्ड वर असलेला गुन्हेगार येणार असल्याची खबर रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांना मिळाली.

मंगळवार 18 फेब्रुवारी  रोजी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचित चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपी अरूण घाग ऊर्फ विकीवय ३२ वर्षेराह - चेंबूर मुंबई  यांस ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता दिनांक २८जानेवारी  रोजी इदौर दौड एक्सप्रेस गाडी गाडीतून प्रवास करीत असताना महिलेचा किंमती ऐवज असलेली लेडीज पर्स चोरी झाल्याबाबत कल्याण रे.पो.ठाण्यात दाखल झाला होता.  हा गुन्हा अरूण याने केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने  त्याला या  गुन्हयात अटक करण्यात येवून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आले.

पोलीस कस्टडीत असताना त्याने सदर गुन्हयासह एकूण तीन गुन्हे केल्याची कबूली दिली असूनगुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागिने झवेरी बाजार मुंबई येथील दोन सोनार तानाजी माने आणि नितीन येळेमुंबई यांना विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्या अनुशंगाने त्यांना गुन्हयात अटक करून त्यांच्याकडून गुन्हयातील चोरी केलेल्या दागिन्यापासून बनविलेल्या सोन्याच्या लगडीमोबाईल फोन व रोख रक्कम हस्तगत करून तीन गुन्हे उघडकीस आणले आहे.

हि कामगिरी लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवेपोलीस उपआयुक्त मनोज पाटीलसहा. पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, यांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकरव पो. निरीक्षक रोहीत सावंत गुन्हे शाखालोहमार्गमुंबईयांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखाकल्याण युनिट येथील सपोनि अभिजित टेलरपो.उपनिरीक्षक प्रकाश चौगुलेसपोउपनिरी संदिप गायकवाड, रविंद्र दरेकरपोलीस अंमलदार लक्ष्मण वळकुंडेअजय रौंधळराम जाधवप्रमोद दिघेरविंद्र ठाकुरवैभव जाधवहितेश नाईकस्मीता वसावेपदमा केंजळअक्षय चव्हाणरुपेश निकमसुनिल मागाडेतांत्रिक शाखेचे सपोनिरीक्षक मंगेश खाडेपोहवा विक्रम चावरेकरसंदेश कोंडाळकरपोशि अमोल अहिनवे यांनी केला असुन, या गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा  वळकुंडे करीत आहेत.

 


Post a Comment

0 Comments