ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एम.एस.पी.अर्थात महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने दरवर्षी होतकरू, कामसु, उपक्रमशील शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. तसेच यावर्षी सुद्धा राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे.त्यासाठी जे शिक्षक तन-मन-धनाने आपली सेवा पार पाडत आहे अशा शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. सदर शिक्षकांना त्यांचे निवडपत्र देण्याचा छोटासा कार्यक्रम एम एस पी कडून जिल्हा निहाय आयोजित करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्याचा निवड पत्र वाटप कार्यक्रम रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी संपन्न झाला.
यावर्षीचा राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार 2025 ठाणे तसेच मुंबई जिल्ह्यातून शिक्षकांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये श्री.सुनिल पाटील आईएस माध्य.शाळा भांडुप, श्री संतोष म्हारसे मुरबाड, श्री.दीपक बडगुजर नवी मुंबई,श्री.रामहरी धोंगडे शहापूर,श्रीमती कमल चौधरी भिवंडी, श्रीमती स्नेहल डोंगरे भिवंडी, श्रीमती स्नेहा सावंत भिवंडी यांना जाहीर झालेली आहे.
या सर्व शिक्षकांचे मोठ्या सन्मानाने निवड पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी एम.एस.पी. राज्य समन्वयक सौ.राजश्री पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी एम एस पी च्या जिल्हा समन्वय श्री.प्रदीप चव्हाण,सौ.अनिता पाटील,एमएसपी सदस्य श्री.नितीन पाटील,श्रीमती शिल्पा देशमुख हे देखील आवर्जून उपस्थित होते.यावेळी एम एस पी सदस्य असलेल्या निकिता गोस्वामी यांची राज्य कार्यकारणी वर निवड झाल्यामुळे त्यांच्या राज्य समन्वयकाचे निवड पत्र देऊन त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व शिक्षकांनी सेवा सन्मान पुरस्कारसाठी निवड केल्याबद्दल एमएसपी चे आभार मानले. व एमएसपी करत असलेल्या चांगल्या कामाचे कौतुकही केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments