ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील प्रभागनिहाय मोठ्या नाल्याची पावसाळ्यापूर्वी पावसळ्यानंतर सफाई कामासाठी केडीएमसीच्या 10 प्रभागनिहाय मोठ्या नाल्याच्या सफाई साठी तब्बल 4 कोटी 29 लक्ष 80 हजार 846 रू कामाच्या निविदा प्रसिद्धी झाल्याने सन 2025-2026 मोठ्या नालेसफाई कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरवर्षी नाले सफाईच्या निविदा प्रक्रियेला उशीर होत असतो यामुळे नालेसफाईची कामे सुरू होण्यास विलंब लागतो. या तुलनेत यंदा निविदा लवकर प्रसिद्ध करण्यात आल्याने नालेसफाईची कामे लवकर मार्गी लागणार असे चिन्ह दिसत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महत्वाच्या मोठया नाल्यांची सन २०२५ - २६ मध्ये सफाई करण्याच्या कामासाठी प्रभागक्षेत्र निहाय निविदा मगाविण्यात आल्या असून या निविदा मागविताना अटी शर्ती व विशेष बाबी अंतर्भुत करण्यात आल्या असून यामध्ये पूर्ण वर्षभर काम करावं लागणार असून तीन टप्प्यात देयक देऊन वर्षांच्या शेवटी उर्वरित देयक अदा केले जाणार आहे. एकुण रक्कम ४ कोटी २९ लाख ८० हजार ८४६ इतक्या खर्चाची तरतूद प्रभागनिहाय मोठ्या नालेसफाई करण्यासाठी करण्यात आली आहे.
मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या ठेक्यासाठी पलिका वर्तुळात ठेकेदारांमध्ये स्पर्धा लागते. यामुळेच 18ते 28टक्के बिलो जात मोठ्या नाले सफाईची काम मिळण्यासाठी स्पर्धा होते. दरवर्षी मोठ्या नालेसफाईची पोलखोल पहिल्या पावसात दिसून येते. तक्रारीचे निराकरण करण्यात आणि मोठे नालेसफाई दौरा आणि तु तू में या मध्ये मोठ्या नालेसफाई ची कामे करून घेण्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. ठरविक एजन्सी आपली मोनोपाली कायम ठेवण्यासाठी कार्यरत असताना दरवर्षी दिसते. परंतु दंडात्मक कारवाई आणि कामचूकार पणाचा ठपका असलेल्या एजन्सी उजळ माथ्याने निविदा प्रक्रिया पार पाडित आपल्या एजन्सीला काम मिळवून घेतात.
यंदाच्या मोठ्या नालेसफाई कामासाठी प्रशासनाने विशेष अटी शर्तीत घालून लगाम लावलेला दिसून येत आहे. यामध्ये 15 जून पर्यंत 80 टक्के काम अपेक्षित आहे. 15 आँक्टोबर पर्यंत 90 टक्के काम तर 31 मार्च पर्यंत 100 टक्के काम असा टप्पा अटी शर्ती नुसार निविदेमध्ये टाकण्यात आला आहे. या टप्प्यानुसारच देयक अदा केले जाणार आहे.
दरम्यान याबाबत केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन उप आयुक्त अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात प्रभाग निहाय मोठ्या नाल्यांच्या साफ सफाई कामाला प्रत्यक्ष पणे सुरुवात होईल असे सांगितले.
.jpg)





Post a Comment
0 Comments