साखळी उपोषणाचा आजचा पाचवा दिवस
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अखिल विश्वातील बौद्ध धर्मीयांचे सर्वोच्च धम्मस्थळ तथा भगवान बुद्धांचे संबोधि स्थान तसेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मान्यता प्राप्त महाबोधि महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे द्यावे,तेथे सुरू असलेले धार्मिक कर्मकांड हे परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञाच्या विरोधात आणि धम्माच्या विसंगत असे या ठिकाणी होत असल्याकरणाने जगभरातील बौद्ध अनुयायी यांच्या आस्था व धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे बोलले जात आहे.पवित्र महाबोधी महाविहार गैर बौद्धांच्या प्रबंधन व वैदिक ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करण्याकरिता शेकडो बौद्ध भिक्खू तसेच जपान, चीन, कोरिया, थायलंड, म्यानमार, श्रीलंका, लावस, कंबोडिया, मंगोलिया, व्हियतनाम, हॉगकॉंग, नेपाल, तिबेट, सिंगापुर, भूतान, तैवन या बौद्ध देशातील ब अनुयायी तसेच युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या महाद्वीपातील विपश्यी साधक बुद्धगया येथे दि. १२/०२/२०२५ पासून आमरण उपोषणाला बसले आहे.
बुद्धगया येथे आमरण उपोषनास बसलेले बौद्ध प्रतिनिधी यांची प्राशासनाने त्वरित भेट घेऊन महाबोधी महाविहार गैर बौद्धांच्या ताब्यातून मुक्त करावे तसेच बौद्धांचे सर्वोच धम्मस्थळाला विद्रुपीकरण करणारे ब्राह्मण पुरोहित यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.तसेच 1949 चा बोधगया मंदिर कायदा रद्द करावा, अशी त्यांची मागणी आहे.
यासाठी कल्याण शहरातही बौद्ध धर्मियांकडून एक आठवड्याचे लक्षवेधी व्यापक धरणे आंदोलन, साखळी उपोषण करण्यात येत आहे.आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून,देशभरात सुरू असलेल्या या आंदोलनाला कल्याण शहरातून ही पाठबळ मिळत आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आदरणीय भदंत गौतम रत्न महाथेरो जी यांच्या नेतृत्वाखाली सात दिवसीय साखली उपोषण सुरु आहे, आंदोलनाला महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून, नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. बुद्धभूमी फाऊंडेशन आणि समर्थनार्थ डझनभर संघटना राबवत असलेल्या या चळवळीचा कल्याणमध्ये 8 मार्च रोजी आक्रोश मोर्चासह समारोप होईल असे सांगण्यात आले आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments