Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, नवी मुंबई यांच्या मार्फत विविध पुरस्कार जाहीर

 

                    ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर 

नवी मुंबई येथील ग्लोबल गोल्ड टॅलेन्ट बुक ऑफ रेकॉर्ड तुर्फे छ. शिवाजी महाराज यांच्या  जयंती निमित राष्ट्रस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र रत्न /  आदर्श शिक्षक /महाराष्ट्र रत्न पुरस्कार दि.०९ मार्च २०२५ रोजी (रविवार) आगरी समाज मंगल कार्यालय, कामोठे येथे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सपन्न होणार आहे.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून  नयना आपटे पद्मश्री (भारत सरकार )

सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री,साक्षी सुबोध नाईक (अभिनेत्री)रत्ना खंडेलवाल ( सहाय्यक पोलीस निरीक्षक)रामजीत ( जितु ) महादेव गुप्ता (मुख्य तपासी अधिकारी मुंबई) यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून  ९३०अर्ज प्राप्त झाले होते, त्यातून ५० विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, पुरस्कार स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, आकर्षक मेडल व पुस्तक देवून सन्मानित करण्यात येणार आहे, असे आयोजक संस्थेच्या संचालिका मेघा महाजन यांनी सांगितले.  पुढील पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या नावांची  घोषणा  या वेळी बोलतांना त्यांनी केली.

छ. शिवाजी महाराज महाराष्ट्र रत्न पुरस्कार

निलेश पवार,आरती  धनवडे, अर्पणा  देशमुख, शारदा राणा, प्रकाश माळी, रमेश झगडे, राजेश  घायल, अशोक पाटील,सोनल शुक्ल, काश्मिरा अश्विन शुक्ल,दादा खांडेकर,विजया शं.झाडे,पुष्पलता गावंडे,जगदीश खंडारे,अजय जिरापुरे,संतोष सावंत, प्रशांत शिरोडे ळ, महादेव गायकर.

छ. शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्कार

हनुमंतराव जगताप,छाया पायमोडे .युवराज जाधव, विजय पाटील, बिजाश्री राय, राजू बिरारी 

छ. शिवाजी महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार

सचिन साळवी, रवींद्र अहिरराव. श्री. पठाण शफीक. स्वीटी खरात, प्रदीप सूर्यवंशी,  मोहमद नदीम, सरिता वागदे,चंद्रशेखर साळवे, विजय वाघेला. सतिश मिश्रा. नसीम कुरणे. सोनल भालेकर, सुजाता सूर्यवंशी, साक्षी भोईटे, काजल सुर्वे, ज्योती सनाये, पूनम दीक्षित, स्नेहा कर्णिक, पांडुरंग नाझरे, अनंत सावंत, अफरोज खान

Post a Comment

0 Comments