ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील भाऊराव पोटे माध्यमिक विद्यालय येथे ‘माझी शाळा, माझी भाकरी’ या उपक्रमांतर्गत भाकरी बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा मंगळवारी सकाळी शाळेच्या पटांगणावर संपन्न झाली. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः चुलीवर भाकरी बनविली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टचे बिपिन पोटे आणि आगरी-कोळी कलाकार रश्मिता टावरे उपस्थित होते.
माझी शाळा माझी भाकरी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सुंदर भाकरी बनवल्या. त्याचबरोबर मिरचीचा ठेचा, टोमॅटो मिरचीची चटणी, लसणाची चटणी, खोबऱ्याची चटणी आणि विविध प्रकारच्य चटणी तयार केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी ज्वारीची, तांदळाची भाकरी बनवल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वामन यांनी दिली.
आपल्या देशात स्त्री-पुरुष समानता आहे. कधीकधी पुरुषाला देखील स्वयंपाक करावा लागतो. एखादा विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर गेला तर त्याला स्वयंपाक बनवता आला पाहिजे. बाहेरचे जेवण महागडे असते. त्यामुळे, घराच्या जेवणाला तोड नसल्याने हा उपक्रम मुख्याध्यापक सुरेश वामन आणि अन्य शिक्षकांच्या सहकार्याने राबविण्यात आल्याची माहिती बिपीन पोटे यांनी दिली.
.jpg)

Post a Comment
0 Comments