उड्डाण पुलावर गर्डर टाकण्याच्या
कामासाठी जड वाहनांना स्टेशन परिसरात
वाहतूक बंदी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरातील सॅटीस प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर चालू आहे. यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कल्याण पश्चिमेतील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते कल्याण रेल्वे स्थानक आणि एसटी स्टँड दरम्यान सर्व प्रकारची अवजड वाहने आणि सरकारी तसेच खाजगी बसेस यांना प्रवेश बंद करण्यात आली आहे. हे निर्बंध 3 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आले आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. पोलीस वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड आणि अत्यावश्यक सेवांना यातून सूट दिली जाईल. महात्मा फुले चौकातून कल्याण स्टेशन कडे येणाऱ्या वाहनांना सुभाष चौकात प्रवेश बंदी करण्यात आली असून, ही वाहने सुभाष चौक, प्रेम ऑटो सर्कल, आधारवाडी, दुर्गाडी गोविंदवाडी, पत्री पूल मार्गे गुरुदेव हॉटेल कडून एसटी डेपोत आणि याच मार्गे पुन्हा मार्गस्थ केली जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी दिली .
Post a Comment
0 Comments