ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण तहसीलदार पथकाने अवैध रित्या खाडीतून रेती उपसा करणार्यांवर धडक कारवाईचा बडगा उचलत उंबर्डे परिसरातील कल्याण खाडीतील 4 बार्ज, 5 सक्शन पंप पेटवून देऊन बुडविल्याची कारवाई सोमवारी केली.
कल्याण खाडी परिसरातील उंबर्डे परिसरात सक्शन पंप आणि बार्ज यांच्या सहाय्याने अवैध रेती उपसा होत असल्याची बाब गस्ती दरम्यान समाजल्याने कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांचे पथक घटनास्थळी गेले. 4 बार्ज आणि 5 सक्शन पंपामार्फत अवैधरित्या वाळू उपसा करीत असल्याचे निर्दशनास आले. महसूल विभागाच्या पथकाला पाहताच अवैध रित्या रेती उपसा करणार्या अज्ञातांनी खाडी पाण्यात उड्या मारून पोहून जात पोबारा केला.
घटनास्थळी 4 बार्ज आणि 5 सक्शन पंप पथकाने ताब्यात घेत पेटवून देत पाण्यात अवैधरीत्या रित्या वाळू साम्रुगी बुडवली. या धडक कारवाई मुळे कल्याण खाडी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणार्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या 4 बार्जेसची अंदाजे किंमत 32 लाख तसेच 5 सेक्शन पंपाची अंदाजे किंमत 25 लाख होईल असे दोन्ही मिळून अंदाजे किंमत 57 लाख किंमतीची साधन सामुग्री नष्ट व नादुरुस्त करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
Post a Comment
0 Comments