ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे, यांच्या मार्गदर्शना खाली कल्याण पूर्व येथील चिंचपाडा येथे शिवसेना माजी नगरसेवक तथा विधानसभा प्रमुख प्रशांत काळे आणि माजी नगरसेबिका व शिवसेना महिला उपजिल्हा संगठक माधुरी काळे यांच्या पुढाकाराने व विभागप्रमुख सत्यवान खेडेकर यांच्या विशेष सहकाऱ्याने शाखा क्रमांक ९८ - चिंचपाडा रोड - विजयनगरचे शाखाप्रमुख विशाल वाघमारे आणि विभाग समन्वयक महेद्र एटमे व शाखाप्रमुख प्रदिप तांबे यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाखेचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपशहर प्रमुख नवीन गवळी, महिला विभागसंगठक ज्योती अनेराव, महिला शाखा संगठक अश्विनी दवंडे, शाखाप्रमुख आमराई वासुदेव कदम, विभागप्रमुख संतोष साळवी, विभाग संघटक दिलीप कोल्हे, प्रशांत मांजरेकर यांच्यासह शिवसेना पधादिकारी आणि कार्यकर्ते, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या श्री मोरया प्रतिष्ठानच्या गणेश सभा मंडपाचे देखील यावेळी उद्घाटन पार पडले. या प्रसंगी मोठ्या संखेने मोरया प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लावता येतील याबाबत सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्व स्थानिक शिवसैनिकांना केले. यावेळी शिवसेना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments