Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पूर्व शिवसेनेत पक्षांतर्गत धुसफूस; उपशहरप्रमुख पर्यंत सर्व कार्यकारणी बरखास्त

 

उपशहरप्रमुख पर्यंत सर्व कार्यकारणी बरखास्त

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण पूर्वेतील शिवसेनेत फार आधीपासूनच अंतर्गत धुसफूस असल्याचे समोर येत आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतर एकनाथ शिंदें सोबत असलेल्या पदाधिकारी वर्गातही गटतट बनल्याने पक्षासाठी हे नुकसानकारक बनले आहे. कोळसेवाडी पोलीस स्थानकात शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राढ्यानंतर आता शिंदेंच्या सेनेने शेवटी कल्याण पूर्वेतील महत्त्वाच्या फळीची कार्यकारिणी बदलून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी गुरुवारी एक परिपत्रक जारी केले असून त्यांनी कल्याण पूर्वेतील पुरुष व महिला उप शहरप्रमुख पर्यंतची सर्व पदे स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे. तर आजवर केलेल्या कामाचा आढावा घेऊन नव्याने मुलाखती घेऊन पुन्हा नव्याने पद नियुक्ती केली जाईल असेही त्यांनी या परीपत्रकात म्हटले आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मागील महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना हा कल्याण पूर्वेतील मोठा पक्ष ठरला होता. पुढे शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने तरीही आपलं पारडं जड ठेवलं. अगोदरच पक्षात गटातटाचे राजकारण असताना त्यातच विधानसभा निवडणुकीत शहर प्रमुखाने बंड पुकारल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. यानंतर आता पुन्हा एक अंतर्गत वाद बाहेर पडल्यानंतर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी मोठा निर्णय घेत पदांची नवनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण पूर्वेतील अंतर्गत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता खासदारांना विशेष लक्ष द्यावे लागतेय का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. परिस्थिती न बदलल्यास याचा फटका पक्षाला आणि लाभ मात्र इतरांना मिळू शकतो.


Post a Comment

0 Comments