ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
बृहन्मुंबई महानगरपालीका शिक्षण विभागाचा प्रतिष्ठेचा असणारा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जगदीश देवराम सुर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा येथे संपन्न झालेल्या या समारंभात महानगरपालीका अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी( पूर्व उपनगरे) , उप- आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे आदींसह विविध मान्यवर अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
शारीरिक शिक्षण शिक्षक जगदीश दे. सुर्यवंशी यांना क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालीकेच्या वतीने आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्रदान करण्यात आला. कल्याण पूर्वेला स्थायिक असणारे जगदीश सुर्यवंशी हे सायन मुंबई पब्लिक स्कुल (एमपीएस) , सायन पूर्व येथे शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव हे जगदीश सुर्यवंशी यांचे मुळगाव आहे. जगदीश सुर्यवंशी हे गेल्या १८ वर्षांपासून बृहन्मुंबई मनपाच्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत ते किकबॉक्सिंग, बॉक्सिंग पंचपरीक्षा उत्तीर्ण आहेत.
आपल्या अध्यापन कार्यासोबतच शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. राष्ट्रीयस्तर ०४ , राज्यस्तर २२ खेळाडू प्राविण्यप्राप्त तसेच असोसिएशन आंतरराष्ट्रीय कराटे व मर्दानी स्पर्धेत भूतान व नेपाळ येथे प्राविण्य ०८, राष्ट्रीयस्तर ०७,राज्यस्तर १५ प्राविण्य. किकबॉक्सिंग, बॉक्सिंग, थायबॉक्सिंग, युनिफाईट, वोविनम, मल्लखांब, योगासन, थांग-ता, मर्दानी, जम्परोप इ. क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. ०२ खेळाडूंना महाराष्ट्र शासन क्रीडा शिष्यवृत्ती व २३ विद्यार्थ्यांना महापौर क्रीडा शिष्यवृत्ती तसेच सायन एमपीएस स्पोर्ट्स सेंटर ने शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये ५ वर्षात ३३६ प्राविण्यपदक मिळवली आहे. या सर्व विशेष कार्याची नोंद घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या कार्यासाठी त्यांना सन्मा. कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी, मुख्याध्यापक अनूप सरवदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा परिवार ,सहकारी व अधिकाऱ्यांकडून गौरविण्यात आले तसेच त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments