ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
जिल्हा परिषद साई शाळेत महिलांचा सत्कार करण्यात आला. निमित्त होते महिला दिनाचे. सावित्रीबाई पुण्यतिथी दिनाच्या दिवशी म्हणजेच 10मार्च 2025 रोजी शाळेत महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने शाळेत विविध उपक्रम राबवले गेले. शाळेतील मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील यांनी उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. त्यानंतर साई गावचे सरपंच श्री.हनुमंत भोपी व ग्रामपंचायत सदस्य सौ.वनिता भोपी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्व गावातील उपस्थित माता-भगिनींचे तसेच शाळेचे पालक, निपुण भारत अंतर्गत निवडण्यात आलेल्या लीडर माता पालकांचे त्या करत असलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचेही गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच महिलांतर्फे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.जयश्री भोपी यांनी शाळेतील शिक्षिका यांचा देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. शाळेत दरवर्षी महिला दिन साजरा केला जातो.त्यामध्ये एक विशिष्ट संकल्पना ठरवण्यात येते.यावर्षी गावातील ज्या महिला शिकून नोकरी व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत व कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत अशा महिलांचा सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये किशोरी मोकाशी ही राज्यस्तरावरील खेळणारी खो खो ची उत्कृष्ट खेळाडू , किशोरी ही राज्यस्तरीय खेळाडूच्या गुणवत्तेवर रेल्वेत कामाला लागली व आपल्या आई वडिलांना आर्थिक मदत करत आहे .तसेच गावातील आशा सेविकेचे काम करत असलेल्या व ज्यांना गेल्या वर्षीचा आदर्श आशा सेविका पुरस्कार मिळालेला आहे अशा सौ.मनिषा भोपी यांचा तसेच आताच नियुक्त झालेल्या आशा सेविका सौ. भागीत्रा ऐनकर तसेच अंगणवाडीतील मदतनीस म्हणून काम करणाऱ्या माधुरी भोपी यांचा तसेच भिवंडी तालुक्यात विशेष तज्ञ दिव्यांग विभाग तथा तालुका समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या सौ.गायत्री भोपी या सर्व कर्तुत्ववान महिलांचा तुळशीचे रोप व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनीनी स्वयंस्फूर्तीने बसवलेले गीत 'जन्म बाईचा खूप घाईचा' या नृत्याचे सुंदर असे सादरीकरण केले व त्यातून महिलांचे महत्त्व अधोरेखित केले.शिवाय शाळेतील विद्यार्थिनींची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनीनी झाशीची राणी,अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले यासारख्या वेशभूषा सादर केल्या तसेच शाळेत महिला दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.त्याशिवाय जमलेल्या सर्व महिलांची 'मेणबत्ती पेटवणे 'स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर आशा सेविका सौ मनीषा भोपी यांनी महिलांना ,मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. गरोदर माता व स्तनदा माता यांनी घ्यावयाची काळजी, तसेच लहान मुलांचे लसीकरण वेळच्यावेळी करून घेण्याबाबत सूचना केल्या. गावातील सौ.किरण यादव या महिलांचा सुदृढ गरोदर माता म्हणून गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. त्यामध्ये चित्रकला स्पर्धेत प्रथम आलेली देवश्री सुखदेव भोपी,साई परशुराम वेहेले व काव्या गणेश भोपी यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक देवश्री भोपीने पटकावला तर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे आसावरी मांजरेकर व जान्हवी ऐनकर यांना देण्यात आला. एका माचिस काडीने जास्तीत जास्त मेणबत्ती पेटवने स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक सौ.पूजा सुखदेव भोपी व सविता बामणे यांना तर द्वितीय क्रमांक आलेल्या सौ.समीक्षा मांजरेकरर व सौ. फुलकुमारी देवी यांचे देखील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.
सर्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून मनीषा भोपी, किशोरी मोकाशी,भाग्यश्री भोपी ,पूजा भोपी व विद्या जाधव यांनी काम पाहिले. सौ.ज्योती काशिनाथ भोपी यांनी शाळेतील शिक्षिका अनिता पाटील यांचा भेटवस्तू,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.ज्योती भोपी यांनी महिला दिन या विषयावर सुंदर रांगोळ्या काढल्या त्याबद्दल सर्वांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. बचत गटाच्या अध्यक्षा सौ. संजीवनी भोपी यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली ती म्हणजे उषा भोपी,भाग्यश्री भोपी,ज्योती भोपी,सुनीता भोपी,पूजा भोपी,संजीवनी भोपी, विद्या जाधव,सविता बामणे यांनी.तसेच सरपंच श्री,हनुमंत भोपी त्यांचे शाळेच्या बाईंनी विशेष आभार मानले.कार्यक्रम खूप छान झाल्याचे तसेच खास महिलांसाठी शाळेत कार्यक्रम आयोजित केल्यामुळे शाळेतल्या बाईंचे कौतुक केले.तसेच विविध उपक्रम शाळेत राबविले जात असल्यामुळे आता साई शाळेची ओळख उपक्रमशील शाळा म्हणून झाली आहे असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments