ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
“बुरा ना मानो होली है” असे म्हणत धुलीवंदनच्या दिवशी कल्याणच्या रस्त्यांवर तरुणाई रंगांचा आनंद लुटताना दिसली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण या रंगांच्या उत्सवात नाहून निघाले होते. यंदाही कल्याणकरांनी पाणी बचतीचा संदेश देत कोरडी होळी खेळणे पसंत केले. तर काही ठिकाणी विविध सोसायट्यांमध्ये एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत आनंद लुटला. प्रत्येक गल्ली गल्लीत ग्रुप ग्रुपने तरुणाई रंगांचा हा उत्सव साजरा करत होती. काही ठिकाणी डी.जे. च्या तालावर थिरकताना अनेक जण पाहायला मिळाले.
.jpg)


Post a Comment
0 Comments