ब्लॅक अँड व्हाईट कल्याण
महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील शाळेतील १ ली ते ९ वी च्या वर्गाच्या वार्षिक परीक्षा ८ एप्रिल ते २६ एप्रिल पर्यंत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई, ठाणे सारख्या शहरांमध्ये तापमान खूप वाढले आहे. शहरात शाळा दोन सत्रांमध्ये चालते त्यामुळे शहरातील शाळा खेडेगावाप्रमाणे सकाळी घेता येणे शक्य नाही. शहरात शाळेतील मुलांना उखाड्याला सामोरे जावे लागणार आहे .म्हणून दरवर्षी प्रमाणे शहरातील परीक्षा या १० एप्रिल पर्यंत संपवाव्यात असे मत सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून व्यक्त केले जात आहे असे कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रकाश आनंदा पाटील यांनी सांगितले
.jpg)

Post a Comment
0 Comments