Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करून गावं वाऱ्यावर सोडायची - मनसे नेते राजू पाटील

 

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 14 गावांना वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध दर्शविल्यानंतर याठिकाणचे राजकारण चांगलेच तापले असून या 14 गावांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी होती. आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करून गावं वाऱ्यावर सोडायची हा प्रकार सुरू असल्याची टीका मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून या 14 गावांसाठी निधी जाहीर करावानवी मुंबईला जोडणारा आडीवली भूतीवली बोगदा रस्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण करावा अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.

यावेळी बोलतांना राजू पाटील यांनी सांगितले कि, 14 गावं नवी मुंबईत घेण्याबाबत मी जेव्हा लक्षवेधी टाकली होती तेव्हा गणेश नाईक यांनी जी मागणी केली होती त्याच मागणीवर ते ठाम आहेत. तत्कालीन नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले होते याठिकाणी 5 हजार 900 कोटी येथील इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तर गावांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 591 कोटी खर्च करावे लागतील. काही अतिक्रमणं काढावी लागतील. तीच मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. त्यांच्या मागणी नुसार या बजेटमध्ये तरतूद करणे आवश्यक होते. येथील आमदारांनी देखील या गावांसाठी मागणी करणे आवश्यक होते.

या गावांबाबत आपला पाठपुरावा सुरू होता समिती देखील सोबत होती. तरी देखील हा रेंगाळण्याचा विषय आहे का असा सवाल करत असून ही 14 गावं कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घ्यायची आहेत का ? नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी लक्ष दिले पाहिजे असे राजू पाटील यांनी संगितले. तर लोकसभा निवडणुकीपुरती हि बाब पुढे ढकलली नाही तर तेव्हाच विरोध करणार असल्याची बाब गणेश नाईक यांनी उल्लेख केल्याचे पाटील यांनी सांगत  आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि गावे वाऱ्यावर सोडायची का असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला.

येथील सरकारी जागेवर यांच्याच कच्चे बच्च्यानी गोडाऊन बांधलेत. होम गार्डच्या जागेवर देखील गोडाऊन बांधले आहेत. गणेश नाईक बोलले ते बरोबर बोललेत, त्यांचं नवी मुंबई शहरावर प्रेम आहे. यांच्यासारखे ते ओरडबडून नेणारे नाहीत. त्यामुळे ही 14 गावं आगरी बहुल गावं असून या गावांबाबत सहानभूतीने विचार करून यांवर मार्ग काढावा अशी मागणी मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. 


Post a Comment

0 Comments