ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कोळसेवाडी पोलीसांनी मोटार सायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले असून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे व पोनि साबाजी नाईक यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
रविवारी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार मिलींदनगर, कल्याण पुर्व येथे गस्त घालत असताना दोन अल्पवयीन मुले हे संशयीत रित्या त्यांच्या ताब्यात वेगवेगळ्या दोन लाल रंगाच्या स्कुटी घेवून फिरत असताना दिसून आले. याबाबत त्यांच्या कडे तपास केला असता त्यांच्याकडे मिळुन आलेल्या दोन्ही मोटार सायकल हया चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी यापुर्वी देखील दोन मोटार सायकली चोरी केल्याचे सांगुन त्या देखील काढुन दिल्याने त्यांच्या कडुन चार गुन्हयातील चोरी गेलेल्या १ लाख १२ हजार रुपये किमतीच्या चार मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
हि कामगिरी पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे व सहा. पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पो.नि प्रशासन साबाजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि दर्शन पाटील, संदिप भालेराव व त्यांच्या पथकातील पोहवा राजेश कापडी, मिंलीद बोरसे, विलास जरग, शांताराम सांगळे, भगवान सांगळे, नरेश दळवी, पोशि दिलीप सोनावळे, प्रदीप गिते यांनी केली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments