Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी आयुक्तांनी दिली धाकटे-शहाड आणि नेतीवली येथील शाळांना भेट

                      ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी नुकतीच धाकटे-शहाड येथील शाळा क्र. 33 आणि नेतीवली येथील शाळा क्र.19 यांना भेट देवूनशाळेची पाहणी केली आणि शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची आपुलकीने विचारपुस केली. यावेळी शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव व शिक्षणाधिकारी विजय सरकटेकार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड व इतर अधिकारी त्यांचे समवेत उपस्थित होते.


महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार महापालिका शाळांचा संपुर्णत: कायापालट करण्याचा विडा शिक्षण विभागाने उचलला आहे. त्यानुसार आता महापालिकेच्या सर्व 61 शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुर असूनकामे प्रगतीपथावर आहेत. नविन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्व शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांनी शिक्षण विभाागाला दिले आहेत.

तसेच नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके इत्यादी शालोपयोगी साहित्य दिले जाणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये नवीनतम संकल्पना राबवून शाळांतील पटसंख्या वाढविण्याबाबत कसून प्रयत्न करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी शिक्षण विभागास दिले आहेत.


Post a Comment

0 Comments